मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:27 IST)

नाशकात महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई

women police in Nashik
महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. राज्यात अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई करण्यात आली आहे. मुंबईतील अमानवीय बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी आता राज्यभरात अशी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांकडून दुकानांच्या बाहेर मद्यपान करणाऱ्यांनासुद्धा चोप दिला जातोय.
 
विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून टवाळखोरांची धुलाई केली जात आहे. महिला पोलिसांकडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील उद्याने, खाद्य पदार्थ, दुकानाच्या बाहेर बसून मद्यपान करणाऱ्यांना चोप दिला जातोय. त्यामुळे शहरातील टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.