रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 23 मे 2022 (22:56 IST)

संभाजीराजेंना शिवसेनेने सन्मान दिला पाहिजे- चंद्रकांत पाटील

chandrakant patil
भाजपने संभाजीराजे यांना सहा वर्षांपूर्वी राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा दिली.पण सहा वर्षात कधीही भाजपने पक्षाचा प्रचार करा असे त्यांना सांगितले नाही. नेहमी राज्याचा सन्मान राज्याला दिला आहे. तसा सन्मान शिवसेनेने दिला पाहिजे.जर त्यांच्याकडून भाजपचे तिकट मागण्याचा विचार आल्यास तो निर्णय आम्ही दिल्लीला कळवू असे चंद्रकांत पाटील म्हणाले.ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते.
 
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या महापुराबाबत आज भाजपाची बैठक पार पडली.या बैठकीत पूर येऊ नये याबाबत काय उपाययोजना केल्या जाव्यात.तसेच आला तर काय केले पाहिजे यावर बैठक घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
औरंगाबादच्या भाजपच्या मोर्चावरून बोलताना ते म्हणाले, कोरोनामध्ये सर्वसामान्यांना आक्रोश करण्यामध्ये अडचणी होत्या त्यावेळी अनेक प्रश्न जनतेसमोर होते. त्यावेळी लोक शांत बसले पण आता शांत बसणार नाहीत. लोडशेडिंग सुरु झाले आहे. रेशनधान्य मिळविण्यापासून ते लोडशेडींगच्या सर्व गोष्टी त्यावेळी लोकांनी सहन केल्या.समोर नाथसागरचे पाणी दिसून शुद्ध पाणी लोकांना मिळत नाही. संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी १७ कोटींचा प्रकल्प दिला. शिवसेनेला मात्र त्याचे श्रेय भाजपाला घेऊ द्यायचे नाही. आता प्रशासकाला तो प्रश्न सोडवावा लागेल.प्रशासक म्हणजे महाविकास आघाडी सरकार चालवते असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
इम्तियाज जलील भाजपाला राजकारण करायचे असे म्हणाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बाघायचे का? पेट्रोलचे दर कमी झाल्यावर पण राजकारण बघायचे का? असा सवाल पाटील यांनी केला. हिंदू या शब्दामध्ये किती व्यापक व्याख्या आहे. हे इम्तियाज जलीलला काय समजणार. हिंदू समजा दुसऱ्यावर प्रेम करणारा आणि दुसऱ्याला मोठा करणारा आहे असा टोलाही पाटील यांनी लगावला.