सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (15:23 IST)

महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरणार – संजय राऊत

मुंबई – सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग मिळाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजपच्या सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच वक्तव्य चांगलच गाजत आहे. “शिवसेना ही महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये लवकरच रंग भरणार आहे, तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती आहे असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे”. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
 
विविध आमदार शिवसेनेला समर्थन देत आहेत असही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निकालानंतर मातोश्रीवर धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे, शिवसेनेला तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला भविष्यात आणखी समर्थन मिळेल असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
सध्या पक्षीय बलाबल पाहता सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आहे हे संजय राऊत यांनी सामनाच्या एका लेखातून म्हटल होत. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल अस संजय राऊत यांनी म्हटल आहे.