अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या नियोजित जागेवर भूमिपूजन करण्यात येणार आहे. याबाबत नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना माहिती दिली होती. या शिवस्मारकाचा आराखडा तयार असून कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यावेळी भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी बीकेसी येथे जाऊन मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करतील त्यानंतर त्यांची वांद्रयात जाहीर सभा होणार आहे.