गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , गुरूवार, 18 मे 2017 (12:32 IST)

ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी

दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांना त्यांच्या घरी जाऊन तीन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा अहदनगर प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, बहुजन पत्रकार संघ, नगर तालुका पत्रकार संघ, फोटोग्रार संघटना, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांना तत्काळ अटक करुन कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर प्रेस क्लब व सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आश्‍वासन पत्रकारांच्या शिष्टंडळास दिले. 
 
हकीगत अशी की, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांना त्यांच्या नगर येथील निवास्थानी १६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञात इसामानी तू माझ्या विरोधात बातमी छापतो काय, बाहेर ये, तुला मंडले काय ते दाखवतो, तुला संपवून टाकतो, असा दम दिला. तसेच अर्वाच्य शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिली. याबाबत ज्येष्ठ पत्रकार शिर्के यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात 688/2017 नुसार भा.द.वि. कलम 504, 506 नुसार तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 
 
जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यातील दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. 
 
याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, समाचारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, महेश देशपांडे, शिवाजी शिर्के, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष सुदाम देशमुख, कार्याध्यक्ष सागर शिंदे, बहुजन पत्रकार संघाचे भगवान श्रीमंदीलकर, केदार भोपे, नगर तालुका पत्रकार संघाचे जितेंद्र निकम, सुर्यकांत वरकड, सचिन कलमदाने, अ‍ॅड. शिवाजी कराळे, कैलास ढोले, सय्यद वहाब, वाजीद शेख, मुकुंद भट, अविनाश निमसे, सुनील चोभे, सुभाष चिंधे, विक्रम बनकर, वैभव घोडके, धनंजय गांधी, राजेंद्र त्रिमुखे, अंबरिश धर्माधिकारी, निखील चौकर, सिद्धार्थ दीक्षित, जितेंद्र अग्रवाल, सचिन शिंदे, समीर मणियार, राजू खरपुडे, बबलु शेख, नितीन निलाखे, दत्ता उनवणे, जयदिप कारखिले, भास्कर कवाद, सचिन रासकर, सौरभ गायकवाड, विनायक लांडे आदी उपस्थित होते.