गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2017 (22:49 IST)

बेळगाव : माजी महापौर सुंठकराना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

shivaji sunthkar

निवृत्त पोलीस उपअधीक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. सुंठकरांना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे. रामतीर्थ नगरमधील निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद पडोलकर यांना मारहाण केल्याचा आरोप शिवाजी सुंठकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयपीसी 307, 323, 324 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पडोलकर वॉकिंगला जात असताना सुंठकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.