Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकड्याला कधी धडा शिकवणार- शिवसेना

Updated: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (15:48 IST)

शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकड्य़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे. 

पाकड्य़ांच्या सीमेपलीकडून होणाऱ्या कुरापती थांबलेल्या नाहीत. त्यांचे शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार आणि दहशतवादी हल्ले यात आपण दर तीन दिवसांआड आपला एक जवान गमावत आहोत. आता रविवारी कपिल कुंडूसारखा २२ वर्षांचा होनहार कॅप्टन आणि तीन जवान गमावले. मग त्या सर्जिकल स्ट्राईकचा किंवा दहशतवाद्यांच्या खात्म्याचा काय परिणाम पाकिस्तानवर झाला, असा प्रश्न पडतो. तो झालेला नाही असाच रविवारी त्यांनी पुन्हा केलेल्या गोळीबाराचा आणि कपिल व इतर तीन जवानांच्या हौतात्म्याचा अर्थ आहे. मात्र हे किती काळ चालणार? लष्करी जवानांचे आयुष्य म्हणजे ‘बडी जिंदगी’च असते आणि ते त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठीच वाहिलेले असते हे मान्य केले तरी राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे आमचे सैनिक युद्धाशिवाय शहीद होण्याचा सिलसिला किती काळ सुरू राहणार आहे. पाकिस्तान कालपर्यंत सीमेपलीकडून गोळीबार करीत होता. उखळी तोफांचा मारा करीत होता. आता त्यांनी छोटी क्षेपणास्त्र डागण्याची आगळीक केली. आम्ही त्याला जशास तसे प्रत्युत्तर कधी देणार? की आम्ही आमची क्षेपणास्त्र दिल्लीतील राजपथावरील संचलनात परदेशी पाहुण्यांसमोरच मिरवीत राहणार? शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकडय़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबईत दूध महागले; साखरेनंतर आता सीएनजी (CNG), दूध आणि अंडी महागली; जाणून घ्या तुमच्या घरगुती बजेटवर याचा कसा परिणाम होईल

व्हॉट्सॲप व्हिडिओमुळे पसरलेल्या अफवांमुळे धुळेच्या दोंडाईचा येथे हिंसक जमाव उसळला

LIVE: धुळ्यात अफवांवरून हिंसाचार, दगडफेक, तीन पोलीस जखमी

नेपाळमधील पुरात महाराष्ट्रातील 80 पर्यटक बेपत्ता; शिंदे यांचे शिवसैनिक बचावकार्यासाठी रवाना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्राथमिक मराठी शिकण्यासाठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला

पुढील लेख
Show comments