शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (16:49 IST)

दुष्काळीप्रश्नी शिवसेनेचे राज यांना उत्तर

“जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.  
 
“गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत”, असं अनिल परब यांनी नमूद केलं.