धक्कादायक! गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा दुदैवी मृत्यू
सध्या देशात सर्वत्र नवरात्रोत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने दणक्यात सुरु आहे. नवरात्रोत्सवात सर्वत्र गरब्याचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या संख्येने गरबा खेळण्यासाठी जातात. लहान मुलांपासून वयोवृद्ध देखील गरबे खेळतात. गुजरात मध्ये गेल्या 24 तासात गरबा खेळताना 10 जणांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 13 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. शुक्रवारी 24 वर्षीय मुलाचा गरबे खेळताना खाली कोसळून दुर्देवी मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. कमी वयातच लोकांना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या प्रमाणांत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
गुजरात मध्ये नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये आपत्कालीन विभागाला हृदयाशी संबंधित समस्यांसाठी 521फोन कॉल केले गेले, तर श्वासोच्छ्वासाचा समस्येसाठी सुमारे 609 फोन कॉल करण्यात आले. संध्याकाळी 6 ते पहाटे 2 च्या सुमारास हे फोन कॉल आले.
गरबा आयोजकांना गरबाच्या कार्यक्रमस्थळी रुग्णवाहिका तयार ठेवण्याचे तसेच आपत्कालीन सुविधा तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहे. डॉक्टर आणि रुग्णवाहिका तयार ठेवणाचेही सांगण्यात आले आहे.
Edited by - Priya Dixit