सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (17:44 IST)

Surat : गणपतीच्या मूर्तीने मुलाचा जीव वाचवला

ganesha idol
Surat : अंनत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. 10 दिवस आपल्या घरात आणि सार्वजनिक मंडळात स्थापित केलेल्या गणपतीचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहात करण्यात आले. गणपती विसर्जनाच्या वेळी अपघात होतात. कित्येकांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. मात्र गणपतीच्या मूर्तीने एका मुलाचा जीव वाचवला असल्याची घटना गुजरातच्या सुरत शहरात घडली आहे.

गुजरातच्या समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा जीव गणपतीच्या मूर्तीमुळे वाचला. हा मुलगा सुमारे 36 तास गणपतीच्या मूर्तीची चौकट धरून तरंगत होता. अखेर मच्छीमाऱ्यांचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याचा जीव वाचवला. लखन असे या मुलाचे नाव आहे. लखन शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आजी , भाऊ, बहिणी सोबत समुद्रावर फिरायला गेला असता हा अपघात घडला. करणं आणि लखन बीचवर अंघोळ करायला गेले असता तेवढ्यात एक जोरदार लाट आली आणि त्यात करणं आणि लखन अडकले काही लोकांनी करणं ला लाटेतून वाचवले.

मात्र लखन लाटेतून वाहत गेला. मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. बचाव पथक अग्निशमन दल , गोताखोर , मच्छीमार त्याचा शोध घेऊ लागले. मुलगा लखन श्वास घेत होता. शनिवारी शोधात असताना काही मच्छीमारांना लखन गणेशाच्या मूर्तीची चौकट धरून असताना तरंगताना दिसला. त्यांना मृतदेह वाटले .

नंतर मुलाला सुखरूप बघून त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी लखन ला पाण्यातून बाहेर काढूंन तातडीनं रुग्णालयात नेले. नवसारी जिल्ह्यातील भाट गावातील रसिक तांडेल हा मच्छीमार आपल्या टीमच्या 7 सदस्यांसह गेल्या 5 दिवसांपासून समुद्रात मासेमारी करत होता . तांडेल हे शनिवारी दुपारी नवसारी किनाऱ्यापासून 22 किमी अंतरावर आपल्या बोटीतून जाळे टाकत होते. यावेळी त्यांना समुद्रात मूल दिसले.
 
टंडन यांनी बोट त्यांच्याकडे नेली आणि समुद्रात उडी घेतली. जेव्हा ते लखनजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्याने गणेशाच्या मूर्तीची लाकडी चौकट धरली आहे. त्याची प्रकृती दयनीय होती, पण मच्छिमारांच्या टीमने त्याची काळजी घेतली. आधी त्याला पाणी दिले आणि नंतर चहासोबत खायला बिस्किटे दिली.त्याला रुग्णालयात नेण्यात आले .आता त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या त्याला आयसीयू मध्ये ठेवले आहे त्याच्यावर चाचण्या केल्या जाणार आहे. नंतर त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाईल. गणपती बाप्पाने एका मुलाचा जीव असा वाचवला. 
 
Edited by - Priya Dixit