मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (14:00 IST)

धक्कादायक! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर धावत्या टॅक्सी मध्ये अत्याचार

rape
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत एका मतिमंद मुलीचे अपहरण करून धावत्या टॅक्सी मध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आधी या अल्पवयीन मुलीचे दादर वरून अपहरण केले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर मुलीला मालवणीला सोडले. 

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींना अटक केली आहे. सलमान शेख आणि प्रकाश पांडे असे या आरोपींची नावे आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर अत्याचार होणे, विनयभंग होणे, अश्लील वर्तन करण्याच्या तक्रारी वाढत आहे. अत्याचार होण्याच्या बाबतीत मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाठोपाठ नागपूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षितते बाबत प्रश्न उद्भवत आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit