धक्कादायक ! घरात शिरून 2 बहिणींना जाळण्याचा प्रयत्न
दोन सक्ख्या बहिणींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे.नाशिकच्या मखमलाबाद परिसरात पंचवटीतील शिंदे नगर येथील एका सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात शिरून एका व्यक्तीने आग लावण्याची घटना घडली आहे.या आगीमध्ये भारती गौड आणि सुशीला गौड अशा दोन सक्ख्या बहिणी गंभीररीत्या जखमी झाल्या आहे. सदर आरोपी एक रिक्षाचालक असून त्याचे नाव सुखदेव कुमावत आहे.त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीची त्या कुटुंबातील महिलेशी वादावादी झाली या प्रकरणामुळे आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलून पेट्रोल घालून दोन्ही बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.या अग्निकांडात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याचे बघून अन्य नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. घटनेचे कारण अद्याप माहीत नाही.पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे.
पंचवटी पोलिसांनी घटनेनंतर आरोपी सुखदेवला जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली अटक केली आहे आणि त्याच्या वर जीवे मारण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.