मिसळ फेम आजीचं निधन  
					
										
                                       
                  
                  				  नाशिक मध्ये फेमस असलेले 'सीताबाई मिसळ'च्या संचालिका  म्हणजेच मिळसवाल्या आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताबाई दगडूशेठ मोरे यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाने मिसळ प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
				  													
						
																							
									  
	 
	कोल्हापूर आणि पुण्याच्या मिसळी प्रमाणेच नाशिकच्या मिसळला राज्यभरात प्रसिद्ध करणाऱ्या मिसळवाल्या आजी यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मिसळची भुरळ त्यांनी नाशिककरांना पाडलीच होती.या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील मोठे नेत्यांनी देखील त्यांची मिसळ चाखली होती. त्यांनी तब्बल 75 वर्षा पासून मिसळप्रेमींच्या मनावर राज्य केले होते. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या शेवट पर्यत स्वतःच कार्य करत राहिल्या. त्यांनी कधीही दुसऱ्यांवर अवलंबवून राहून काम केले नाही.त्या हॉटेलला स्वतः सांभाळायचा.