शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (08:03 IST)

महाविकास आघाडी सरकारनं राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देणार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
 
“माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या नावाने आगामी वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाणार आहे.हा पुरस्कार स्वर्गीय श्री. राजीव जी यांच्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कायमस्वरूपी आदरांजली असेल.”,असं ट्वीट सजेज पाटील यांनी केलं आहे.
 
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ रोजी घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.