सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (14:52 IST)

धक्कादायक ! मुलाने केली जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या, मुलाला अटक

murder
आई आणि मुलाचं नातंच वेगळं असत. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावते. मात्र एका मुलाने आपल्या जन्मदाती आईलाच ठार मारले आहे. 

नवी मुंबईच्या कोपरी गावात एका मुलाने कामावर जाण्यावरून झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात येऊन गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
सदर घटना नवी मुंबईच्या कोपरी गावात घडली आहे. कामाला जाण्यावरून आई सलमा रहमान शेख आणि रुपचंद मुलामध्ये मध्यरात्री भांडण झाले. रागाच्या भरात येऊन मुलाने आईची गळा आवळून हत्या केली.  सलमा रहमान शेख असे या मयत महिलेचे नाव आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आणि आरोपी मुलाला अटक केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit