1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Umarkhed 73 passengers got off the running bus and set the bus on fire

Umarkhed :चालत्या बसमधून 73 प्रवाशांना उतरवून बस पेटवली

उमरखेड तालुक्यात गोजेगाव नजीक पैनगंगा पुलावर अज्ञात महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बसमधील 73 प्रवासी सुखरूप आहे. 
नांदेड आगाराची नांदेड- नागपूर बस रात्री 11 वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने बस थांबवली त्याच्या सोबत पाच -सहा जण होते. बस थांबलेली पाहून सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. 
 
सुदैवाने बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहे. या घटनेमुळे बसचे सुमारे 32 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस पेटवणारे कोण होते हे समजू शकले नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

या घटनेची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.त्यांनी पर्यायी बसची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना नागपूर कडे सुखरूप रवाना केले. बसला आग लावण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
Bareli : शिक्षक झाला हैवान, विद्यार्थिनीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल