बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (20:15 IST)

ठाकरे गटाच्या माजी आमदाराची गाडी फोडली

car damage
बीड : राज्यात मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलने होते आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.  तर आता आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, ठीकठिकाणी राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे.
 
दरम्यान, बीड जिल्ह्यात ठाकरे गटाच्या माजी आमदाराची गाडी संतप्त मराठा तरुणांकडून फोडण्यात आली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडण्यात आली आहे. पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, मादळमोही येथे त्यांची गाडी फोडली गेली आहे. संतप्त मराठा तरुणांनी ही गाडी फोडली आहे. तर, गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.