गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (08:32 IST)

सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर डागली तोफ; म्हणाल्या ..

Sushma Andhare
शिवसेना ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्यावर निशाणा साधला. ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणावरून अंधारे यांनी हल्ला चढवला.
 
नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर सडकून टीका केली.
 
महाराष्ट्र ड्रगमुक्त व नशामुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र हा उडता पंजाब होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रग्ज कारवाईवर भाष्य केले. आपल्या घरात व्यसन झाले नाही पाहिजे, असे प्रत्येक महिलेला वाटते, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये असं वाटत असतं, अशावेळी नाशिकचा पालकमंत्री काही गोट्या खेळतं होता का? अशी सवाल त्यांनी दसरा मेळाव्यात केला.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor