1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (08:19 IST)

राज्यपालांनी तातडीने राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा

sanjay raut
नाशिक -  राज्यपालांनी तातडीने राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
 
ते पुढे म्हणाले की राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आपले रक्षण करण्यासाठी म्हणून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत परंतु येणाऱ्या काळात त्यांना किती संरक्षण मिळेल यावर शंकाच आहे.
 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांचे स्वागत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, वसंत गिते, विनायक पांडे, आदींसह अन्य शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले.
 
त्यावेळी नाशिक मध्ये सुरू असलेल्या ड्रग रॅकेटच्या संदर्भामध्ये त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यपालांनी तातडीने राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा. ते या सर्व प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत आणि आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून उपलब्ध पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही  तर दुसरीकडे राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आपली स्वतःची प्रतिष्ठा जपावी म्हणून आणि ईडी पासून संरक्षण मिळावे म्हणून सध्या सत्तेत सहभागी झाले आहेत. परंतु येणाऱ्या काळात कुठल्या पक्षामध्ये सहभागी होतील हे बघण्यासारखा आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
जर गृह विभागाची इज्जत जपायची असेल तर तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा पूर्ण तपास झाला पाहिजे. कारण पाटील याला पुण्याच्या ससून रुग्णालयात कोण आसरा देत होतं, अर्थरोड कारागृहामध्ये कोण मदत करत होते या सर्व प्रश्नांची उत्तरे हे मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.