मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2023 (20:50 IST)

नाशिक : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला

नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात  देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. सध्या  अधिक मास आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यात कलाकारांसह अनेक नेते, प्रसिद्ध व्यक्ती देखील त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. गुरुवारी अभिनेत्री कंगना रनौतने त्र्यंबकेश्वर दरबारी येऊन दर्शन घेतले. तर शनिवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देखील कुटूंबियांसमवेत त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. शक्तिकांत दास यांच्या हस्ते त्र्यंबकराजाची पूजा आणि अभिषेक कऱण्यात आला. 




Edited By - Ratnadeep Ranshoor