अखेर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! पहा कोणाला कोणत्या जिल्ह्याच पालकमंत्री पद..
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला अजून राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालीय. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकत्व मिळालंय. आणि चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री पद देण्यात आलय. तसेच नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडे कायम ठेवण्यात आलय.
जाणून घ्या कोणाला कुठले मिळाले पालकमंत्री पद…
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
Edited By - Ratnadeep Ranshoor