1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (10:26 IST)

उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली, सर्व प्रवासी सुखरूप

Nanded-Nagpur bus from Nanded Agar
उमरखेड तालुक्यात गोजेगाव नजीक पैनगंगा पुलावर अज्ञात महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बसमधील 73 प्रवासी सुखरूप आहे. 
 
नांदेड आगाराची नांदेड- नागपूर बस रात्री 11 वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने बस थांबवली त्याच्या सोबत पाच -सहा होते. बस थांबलेली पाहून सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. 

सुदैवाने बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहे. या घटनेमुळे बसचे सुमारे 32 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस पेटवणारे कोण होते हे समजू शकले नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून प्रकरणाचा तपास करत आहे.  



Edited by - Priya Dixit