सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (08:06 IST)

पणजी : श्रीरामनवमीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर

ramnavami
पणजी : राज्य सरकारने श्रीरामनवमीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली असून आगामी वर्ष 2024 पासून त्याची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे एकूण वर्षातील सार्वजनिक सुट्यांची संख्या एकने वाढून 18 दिवस झाली आहे. पुढील वर्षात बुधवारी 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी आहे. जवळपास 5 ते 6 महिने आधी सरकारने ही सुटी घोषित केली आहे. यापूर्वी तशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती.

लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून ही सुटी देण्यात आल्याची चर्चा होत आहे. राज्य सरकार दरवर्षी वार्षिक सुट्या जाहीर करते त्यात सण, उत्सव, महत्त्वाचे दिवस असतात. त्यात आता रामनवमीचा समावेश झाला आहे. ही सार्वजनिक सुटी यापुढे दरवर्षी कायम रहाणार आहे.
 




Edited By - Ratnadeep Ranshoor