सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:41 IST)

धक्कादायक ! काय सांगता, महाराष्ट्रात 24 लाख विद्यार्थी बोगस आहे

औरंगाबाद : महाराष्ट्रात फसवणुकीचा धक्कादायक खुलासा झाला आहे. राज्यातील खासगी शाळा त्यांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवत असल्याचा आरोप एका जनहित याचिकामध्ये करण्यात आला आहे.
 
राज्यातील 24 लाख विद्यार्थी बनावट असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील खासगी शाळांनी राज्य सरकारच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आला आहे.
 
बीड जिल्ह्यातील बृजमोहन मिश्रा यांनी अधिवक्ता सचिन देशमुख यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली असून राज्यातील सुमारे 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा केला आहे ,जरी  राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या ऑनलाइन आधारकार्डशी जोडली गेली आहे.
 
न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला आणि आर.एन. लड्डा यांनी राज्य सरकारला आधार कार्ड लिंक केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन जमा करण्याचे निर्देश दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.