रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:46 IST)

जळगावात नात्याला काळिमा ! चुलत भावाने दोन लहान भावांचा एकच चपाती दिल्यामुळे जीव घेतला

2 Minor Brothers murder by Cousion :जळगाव जिल्हाच्या यावल तालुक्यात नात्याला काळिमा लावणारी घटना घडली आहे. येथे एका तरुणाने आपल्या दोन निरागस चिमुकल्या भावांचा जेवणात एकच चपाती दिल्याचा राग घेऊन विहिरीत ढकलून खून केल्याचे धक्कादायक वृत्त मिळाले आहे.  रितेश रवींद्र सावळे(6), हितेश रविंद्र सावळे (5) अशी या मयत चिमुकल्यांनी नावे आहेत.तर आरोपी निलेश सावळे याला या चिमुकल्यांचा खून केल्यामुळे अटक करण्यात आले आहे. आरोपी हा मयत मुलांचा चुलत भाऊ आहे. आरोपीने पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चुंचाळे रहिवासी रवींद्र मधुकर सावळे आणि उज्ज्वला रवींद्र सावळे हे दाम्पत्य .यांची चुंचाळे शेतशिवाराला लागून गायरान भागात शेती आहे. यांना दोन मुलं रितेश आणि हितेश असे. सावळे दाम्पत्य आपल्या मुलांना घेऊन शेतात गेले असताना त्यांच्या बरोबर त्यांचा पुतणा निलेश हा देखील होता. दुपारच्या जेवणाच्या वेळेस उज्ज्वला यांनी मुलांना आवाज दिल्यावर ते दोघे आले नाही. शोधाशोध घेतल्यावर देखील दोघे सापडलेच नाही तेव्हा त्यांनी पोलिसात मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी निलेश याची चौकशी करताना त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने घाबरून त्या चिमुकल्यांना जेवणात एकच चपाती दिल्याचा रागामुळे आरोपीने दोघांना विहिरीत टाकल्याची कबूली दिली. पोलिसांनी आरोपी निलेश ला ताब्यात घेऊन विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहे.  मृतदेह बघून मयत मुलांचा आईने हंबरडा फोडला. पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे. आणि प्रकरणाचा तपास करत आहे.