सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:22 IST)

आर्यनच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा NCBचा मार्ग खुला - उज्ज्वल निकम

प्रचंड चर्चेत असलेल्या क्रूज ड्रग्ज प्रकरणी अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. मात्र या जामीनाविरोधात एनसीबीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा अधिकार असल्याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे 

"एनसीबीनं सादर केलेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारे सत्र न्यायालयानं जामीन नाकारला होता. उच्च न्यायालयातही हेच मुद्दे मांडले. पण आर्यन खानच्या वतीनं नामंकित वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर जामीन मंजूर झाला."

आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणांकडे असलेल्या पुराव्यांचं मूल्यमापन करून न्यायव्यवस्था निर्णय घेत असते, असं उज्ज्वल निकम यानी सांगितलं.
 
एनसीबीला या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. ते तो पर्याय स्वीकारणार की नाही, हा त्यांचा निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं.