बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (17:19 IST)

Shri Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचा भाविकांसाठी निर्णय

Shri Tuljabhavani Temple
सध्या सुट्ट्यांमुळे लोक आता देवस्थानी भेट देत आहे. सुट्ट्यांमुळे मंदिरांमध्ये भाविक  मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सुट्ट्यांमुळे भाविकांच्या गर्दी मुळे भाविकांची गैरसोय होऊ नये. या साठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 
 
भाविकांची गैरसोय होऊ नये या साठी आई तुळजाभवानी मंदिरात आता भाविक रात्री एक वाजता देखील देवीआईचे दर्शन घेऊ शकतात. रविवारी पहाटे एक वाजे पासून चरणतीर्थ होऊन दर्शनाला  सुरुवात होणार आहे. 

अधिक मासाच्या शेवटच्या आठवड्यात भाविक मोठ्या संख्येने तुळजाभवानी च्या दर्शनाला येतात. आता 15 ऑगस्ट आणि लगतच्या सुट्ट्या आल्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता तुळजापूर भवानी मंदिर भाविकांसाठी रात्री एक वाजे पासून उघडे राहणार आहे. हा निर्णय तात्पुरती घेतला आहे. जेणे करून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये. 
 
Edited by - Priya Dixit