शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (21:06 IST)

पुण्यातील शुभमला प्रत्येक विषयात 35 गुण

SSC result 2022
पुणे :  पुण्यातील एका मुलाने सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागतं अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी घरी येऊन तो दहावीचा अभ्यास करत असे.
 
दहावीत 35 टक्के गुण मिळवल्याबाबत शुभमला काय वाटते असे विचारल्यावर तो म्हणाला, मला आनंद झाला पण एवढा नाही. मला 60 –50 टक्कयांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे. माझे मित्र 50 टक्कयांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेशा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागते. असे तो म्हणाला आहे.