संबंधित माहिती
- Sainik School Recruitment 2021: सैनिक शाळेत दहावी उत्तीर्ण असणार्यांसाठी भरती
- 'या' गावातल्या ग्रामस्थांनी चक्क मगर खांद्यावर उचलली
- जो बायडन: मास्क वापरण्याची सूचना ते पॅरिस करार, नव्या राष्ट्राध्यक्षांकडून ट्रंप यांचे अनेक निर्णय रद्द
- काय म्हणता, निवडणुकीत विजयी आलेल्या पतीला धाकड पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक
- भूषण, रिया, सायली झाले 'मनमौजी'
नाल्यात सख्खे बहीण-भाऊ वाहून गेले
नागपुरातील हिंगणा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सावंगी देवळी येथील नाल्यात सख्खे बहीण-भाऊ वाहून गेले. आरूषी नामदेव राऊत (वय ११) व अभिषेक नामदेव राऊत (वय ८) अशी या भावंडांची नावे आहेत. आरुषी व अभिषेक हे बहीण-भाऊ रविवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलांच्या आईने हिंगणा पोलिस ठाण्यात दिली होती.
हिंगणा पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्यानंतरही मुले आढळून आली नाहीत. आज सकाळी पोलिस सावंगी देवळी येथे पोहोचले. तिथे दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. कोंबडी पकडता पकडता दोघेही नाल्यापर्यत गेले. तिथे मासोळ्या दिसताच मासोळ्या पकडायला लागले. त्यातच दोघेही पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
