शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (20:59 IST)

सोलापुरात उड्डाणपुलासाठी सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ

solapur
Signature campaign for flyover launched in Solapur सुंदर सोलापूर, विकासशील सोलापूर होण्यासाठी जुना पुणे नाका ते विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी एक लाख सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ अशोक चौक येथून करण्यात आला. सह्यांचा दुसरा टप्पा ६ ऑगस्टपासून पार्क चौक येथे राबविण्यात येईल, यात सोलापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर उड्डाणपूल नागरी कृती समितीचे निमंत्रक निरंजन बोध्दूल यांनी केले आहे.
 
सोलापूर शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्ष झाली आहेत. अद्याप उड्डाणपूल कामास सुरुवात करण्यात आली नाही. सोलापूर शहरात खराब रस्त्यामुळे व खड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन १०० ते १२५ निष्पाप नागरिकांचे बळी गेले. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी सोलापूर उड्डाणपूल नागरी कृती समितीच्यावतीने एक लाख सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याप्रसंगी हजारो नागरिक आपला रोष व्यक्त करत सह्यांच्या मोहिमेत सहभागी झाले. याप्रसंगी लखन बोध्दूल, देवीदास चन्ना, रवी येमूल, राजेश कंदी, अनिल चौगुले, रवी परकीपंडला, पुरुषोत्तम बोगा, विश्वनाथ येलदी, व्यंकटेश कुडक्याल, नरेश देवसानी परिश्रम घेत आहेत.