मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (16:08 IST)

आंबेजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढला आकडा चिंताजनक असताना मृत्यूदर देखील वाढला आहे. यातच अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शनिवार आणि रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. 
 
बीडमधील आंबेजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. यात 28 जणांना मुखाअग्नी देण्यात आला तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  
 
सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेकजण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. .
 
दरम्यान, याआधीही  याच महिन्यात पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे एकाचवेळी 8  जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. एकाच चितेवर आठ जणांना अग्निमुख देण्यात आला होता. आंबेजोगाई शहर कोरोनाचा  हॉटस्पॉट बनले आहे. मांडवा येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आहे.