शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (15:20 IST)

दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल, महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा

सोमवारी दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ऑक्सिजनचे तीन टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत पोहोचली. काल संध्याकाळी गुजरातच्या हापामधून ही एक्स्प्रेस निघाली होती. जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स उद्योगातून ऑक्सिजन घेऊन या एक्स्प्रेसनं ८६० किलोमीटर अंतर कापलं. या एक्स्प्रेसमधील टँकर्समधून महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल.
 
महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर राज्यांमध्येही सध्या ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून मदत करत आहे. यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.