मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:04 IST)

अभिनेत्री दीपिका पदुकोण ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करणार आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे. तसंच काल शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी करण्यात आली.
 
दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले होते.