सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (14:50 IST)

पुढील आठवड्यात ड्रग्स प्रकरणात सारा अली खान- श्रद्धा कपूरची चौकशी करू शकतेः NCB

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थांची चौकशी करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) चौकशीची आपली व्याप्ती वाढवली आहे. एनसीबी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवू शकते.
 
सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने एनसीबीच्या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह बॉलिवूडमधील ए लिस्टमधील अजून अनेक सेलिब्रिटींची नावं दिली. यावर आता एनसीबी विचार करत असून येत्या काही दिवसांत तपास एजन्सी या कलाकारांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावणार आहे. सारा आणि श्रद्धा या दोघांनीही सुशांतसोबत सिनेमात काम केलं आहे.
 
एनसीबीने त्यांच्या तपासाचा वेग वाढवला
एनसीबी या प्रकरणात हळूहळू पुढे जात आहे आणि येत्या काही दिवसांत ते बॉलीवूड यासंबंधीचे प्रश्न विचारण्यासाठी बोलावू शकते. सूत्रांनी सांगितले की एनसीबी आगामी काळात सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची चौकशी करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सारा अली खान सुशांतबरोबर थायलंडच्या ट्रीपला गेली होती तर श्रद्धा कपूर सुशांतच्या फार्महाऊसवर दोनदा गेली होती.