मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मार्च 2020 (13:05 IST)

'अतरंगी रे'मध्ये सारा अली खानचा डबल रोल

Sara Ali Khan
सारा अली खानचा 'लव्ह आज कल' नुकताच रिलीज झाला आहे. सारा त्यात कार्तिक र्आनबरोबर दिसली होती. आता 'अतरंगी रे' या आगामी सिनेमात सारा अक्षकुमार आणि दक्षिणात्य स्टार धनुष या दोन हिरोंबरोबर एकाचवेळी का करताना दिसणार आहे. एकाचवेळी दोन हिरोंबरोबर काम करण्याचे कारण म्हणजे या सिनेमात साराचा डबल रोल असणार आहे. या दोन्ही हिरोंबरोबर भिन्न कालखंडामध्ये सारा रोमान्स करताना दिसणार आहे. सारा बिहारमधील मुलगी असेल, तर धनुष दक्षिणेकडील असेल. 
 
क्रॉस कल्चर्ड लव्ह स्टोरी अशी या सिनेमाची थीम असणार आहे. अक्षकुमारर बरोबरची लव्ह स्टोरी एका वेगळ्यात युगातील कहाणी असणार आहे. त्यात अक्षकुमारचा स्पेशल लूक असेल. पण अद्याप तो फायनल करण्यात आलेला नाही.