शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (18:42 IST)

Sindhudurg : दिराने केला वाहिनीचा निर्घृण खून, आरोपीला अटक

murder
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सावंतवाडीच्या सबनीसवाडा येथे एका दिराने आपल्या वाहिनीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी दिराला अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या सबनीसवाडा येथे एका 35 वर्षाच्या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती.मात्र पोलिसांना तपासात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघडकीस आले. मयत महिलेचे नाव चैत्राली निलेश मेस्त्री असून तिच्या चुलत दिराने संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी दिराने चैत्रालीच्या हत्येची कबुली दिली आहे. 

चैत्राली मेस्त्री लग्नापूर्वी पुण्यात कोथरूडला राहत होती. तिचे लग्न निलेश मेस्त्रीशी झाल्यावर ती  रत्नागिरीच्या खेड येथे पती सोबत राहू लागली. त्यांना तीन मुलं आहे. निलेशला दारूचे व्यसन लागले आणि तो सतत दारू पिऊन चैत्रालीला मारहाण करायचा. सततच्या जाचाला कंटाळून ती माहेरी राहू लागली. 
चैत्रालीचा दीर संजय उर्फ संदेश हा एके दिवशी तिच्या माहेरी गेला आणि त्याने चैत्रालीला गोव्यात येण्याची विनवणी केली. संजयला देखील दारूचे व्यसन असल्यामुळे तिने त्याच्यासोबत येणास नकार दिला. या वरून संजय ने तिला मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. 
 
हे ऐकून ती घाबरली आणि संजय सोबत येण्यास तयार झाली. संजय तिला गोवाला घेऊन गेला नसून सावंतवाडीला काही दिवस इथेच मुक्काम करून जाऊ असे सांगितले. तिथे ते भाड्याच्या घरात राहू लागले. चैत्राली सोबत तिचा 8 वर्षाचा मुलगा होता. एके दिवशी दिराने तिला बाजारात नेले आणि मासे व चिकन घेऊन दिले. आणि घरी जाऊन जेवण तयार करण्यास सांगितले. घरी गेल्यावर चैत्रालीने जेवण तयार केले.

संजय कामावरून परतला आणि जेवण वाढल्यास सांगितले आणि तिच्या मुलाला खेळायला बाहेर पाठवून आतून दार लावून घेतले. जेवण लवकर वाढले नाही या वरून दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात येऊन संजय ने चैत्रालीचे डोकं भिंतीला आपटले नंतर ओढणीच्या साहाय्याने तिला गळफास लावून तिचा निर्घृण केला मृतदेह छतावर लटकावले. या नंतर त्याने वहिनीचा मृत्यू झाला की नाही हे पाहण्यासाठी तिच्या पायाला चटके दिले. नंतर मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याने आरडाओरड करून तिच्या मुलाला बोलावून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.  

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले. शव विच्छेदनाच्या अहवालात तिचा खून झाल्याचे समोर आले. शरीरावरील जखमा पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी संजय उर्फ संदेशाला चौकशीसाठी बोलावले असता त्याने खून केल्याचे काबुल केले. पोलिसांनी आरोपी संदेशाला अटक केली. 

Edited by - Priya Dixit