1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (15:43 IST)

Karnataka : गावकऱ्यांकडून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली, बेळगावातील प्रकार

punishment
कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यात वंटमुरी गावात महिलेला निर्वस्त्र करून विजेच्या खांबाला बांधून मारहाण करून धिंड काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा आईला देण्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. 

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या वंटमुरी गावात एका तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होते. पण मुलीकडील लोक या प्रेमाच्या विरोधात होते. त्यांना मुलीचे लग्न दुसरीकडे लावून द्यायचे होते. त्या दोघांनी घरातून पळून जायचे ठरवले आणि ते 11 डिसेंबरच्या रात्री घरातून पळून गाव सोडून गेले. अशोक आणि प्रियंका असे या तरुण आणि तरुणीचे नाव असून ते एकाच समाजाचे आहे.  

या प्रकारावरून संतापून मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईला मारहाण केली नंतर तिला निर्वस्त्र करून तिची गावातून धिंड काढली. तिला विजेच्या खांबाला बांधले. 

पोलिसांना हा प्रकार कळल्यावर घटनास्थळी जाऊन महिलेला विजेच्या खांबातून बांधलेले सोडले आणि या प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली. 

या घडलेल्या प्रकरणावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संताप व्यक्त केला असून x  वर  लिहून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देण्याचे ते म्हणाले. 

Edited by - Priya Dixit