शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (07:12 IST)

Hockey : पंजाबने मणिपूरला हरवून उपांत्य फेरी गाठली

hockey
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर पंजाबने शनिवारी येथे मणिपूरचा 4-2 असा पराभव करत हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला ज्यामध्ये त्यांचा सामना कर्नाटकशी होणार आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकने झारखंडचा 4-1 असा पराभव केला ज्यामध्ये हरीश मुतगरने 46व्या आणि 49व्या मिनिटाला, कर्णधार शेषे गौडाने 23व्या मिनिटाला आणि सिखित बामने 32व्या मिनिटाला गोल केले. 39व्या मिनिटाला दिलबर बरलाने झारखंडसाठी दिलासा देणारा गोल केला. सोमवारी हरियाणा आणि तामिळनाडू यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. हरियाणाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ओडिशाचा 3-2 असा पराभव केला. 
 
नियमित वेळेपर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. अन्य एका सामन्यात तामिळनाडूने उत्तर प्रदेशवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवत पुनरागमन केले. 27व्या मिनिटाला मनीष साहनी आणि 30व्या मिनिटाला सुनील यादवने केलेल्या गोलमुळे उत्तर प्रदेशने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर कर्नाटकने पुनरागमन केले आणि जे केविन किशोर (33वे मिनिट) आणि कर्णधार जे जोशुआ बेनेडिक्ट वेस्ली (52व्या आणि 59व्या मिनिटाला) यांच्या बळावर विजय मिळवला.
 
पंजाबच्या हरमनप्रीतने 31व्या आणि 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल केले. भारतीय फॉरवर्ड्स सुखजित सिंग (20वे मिनिट) आणि प्रदीप सिंग (6वे मिनिट) यांनीही संघासाठी गोल केले. मणिपूरसाठी कर्णधार चिंगलेनसाना सिंगने 36व्या मिनिटाला आणि ऋषी यमनामने 45व्या मिनिटाला गोल केले. 

Edited by - Priya Dixit