कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, पुण्यातून अतिरिक्त कुमक
कोल्हापूर : कोल्हापूरमधील परिस्थिती काल 3 वाजल्यापासून नियंत्रणात आहे, तरीही खबरदारी म्हणून पुणे येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेव्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तसेच 24 तास महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असून आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. आक्षेपार्ह सोशल मीडिया अकाउंटचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, स्टेट्स ठेवणारी सर्व मुले कॉलेजची आहेत. त्यामुळे कोणी बाहेरून आले होते का, याचा तपास सुरू आहे. तसेच 3 गुन्ह्यांमध्ये 300 ते 400 गुन्हेगार असून आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आली आल्याची माहिती त्यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor