रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (17:28 IST)

Pune : अल्पवयीन मुलीने आईच्या मदतीने वडिलांचा खून केला

murder
पुणे ज्याला विद्येचे माहेर घर म्हटले जाते. अली कडेच सतत गुन्हेगारी वाढत आहे. पुण्यात प्रेम प्रकरणातून गुन्हे सातत्याने घडत आहे. प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे एका पिताला प्राणाने मुकावे लागले.जॉन्सन लोबो असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.  प्रेम संबंधांना विरोध केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने आपल्या जन्मदात्या पिताचा प्रियकर आणि आईच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुली, आई आणि मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे.  

सदर घटना पुण्यातील वडगाव शेरी येथे घडली आहे. वडगाव शेरी मध्ये जॉन्सन लोबो यांचा 30 मे च्या रात्री खून करून मृतदेह सणसवाडी परिसरात नेऊन टाकला होता. सणसवाडी भागात मृतदेह आढळला अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा शोध केला असता सम्पूर्ण प्रकार उघडकीस आला. 

सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आली. या प्रकरणात मयत जॉन्सनच्या पत्नीने पतीच्या मोबाईवर तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचं स्टेट्स ठेवण्यात आले होते आणि स्वतःच्या मोबाईलवरून नवऱ्याला थॅन्क्यु म्हणून मेसेज पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो , अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर जॉय कसबे यांना अटक केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit