1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Six month old baby killed in a leopard attack in Bhandara district

भंडारा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पौनी तालुक्यात, तिरिन गावात बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या आदविक अभिमान बोंद्रेचा मृत्यू झाला. अशी धक्कदायक माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार १३ नोव्हेंबरच्या रात्री, तिरिन गावात सहा महिन्यांचा आदविक आपल्या आई आणि दोन मोठ्या बहिणींसोबत स्वयंपाकघरात खेळत होता. थोड्याच वेळात, मुलाचा मृतदेह घरामागे आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात दुःख आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांच्या आदविक अभिमान बोंद्रेवर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर, वन्यजीवांच्या वाढत्या धोक्यामुळे सुरक्षा उपायांची मागणी करत संतप्त गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. शनिवारी, पोलीस संरक्षणाखाली वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, तसेच आर्थिक मदत आणि सुरक्षेच्या आश्वासनानंतर, कुटुंब अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
पुढील लेख
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका कधी सुरू होणार? संपूर्ण वेळापत्रक पहा