बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार
बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरातून एक कुटुंब आपल्या मुलीसह परळी येथे आले आणि दुपारी जेवण केल्यावर परळी रेल्वे स्थानकावर झोपले. आरोपी कुटुंबाला झोपलेलं पाहून मुलीला पळवून उड्डाण पुला कडे घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आणि पसार झाला.
पीडित चिमुकली ओरडून रडू लागली. नंतर परिसरातील लोकांनी तिचा रडायचा आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीला रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून त्यांनी पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला तातडीनं परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले.
या वेळी मुलीचे आईवडील देखील तिथे होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघता तपास सुरु केलं आणि आरोपीला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीला अवघ्या 5 तासांच्या आत शोधले आणि बेड्या घातल्या. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Priya Dixit