रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (08:01 IST)

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

Photo -CMoशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
 
ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडून दाखवा, हे माझे त्यांना आव्हान आहे. मात्र ते करताना माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मते मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो, असे त्यांनी शिंदे गटाला सुनावले होते. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या अडीच वर्षांपासून त्या प्रसार माध्यमांपासून दूरच होत्या.
 
एकनाथ शिंदे यांचे कार्य मी पाहिले आहे. ते आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असल्याने त्यांना शुभेच्छा द्यायला मी आले असल्याचे स्मिता ठाकरे यांनी स्पष्ट केले.