नवनीत राणा यांच्या मतदारसंघात कुपोषणामुळे “इतक्या” बालकांचा मृत्यू
मुंबई :मेळघाटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये गेल्या पाच महिन्यात ११० बालकांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण केली केल्या कमी होत नाही. तर दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण परिस्थीती समोर आली आहे.
नवनीत राणायांच्या मतदार संघातील ही घटना असून, विशेष म्हणजे एकट्या धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ११० बालकांपैकी शून्य ते सहा महिने या वयोगटातील ७७ बालकांचा समावेश आहे.
तर ३३ बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते. सोबतच दोन गरोदर मातांचा ही यात मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.