बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 30 मे 2021 (11:09 IST)

परभणीतील जवानाचे पठाणकोट मध्ये निधन

पठाणकोट येथे हवाई दलात कामगिरीवर असलेले पूर्णा तालुक्यातील महागावचे जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांचे गुरुवारी निधन झाले. मोहिते ते दोन महिन्यापूर्वीच आपल्या गावी आले होते.आणि कोरोनाने बाधित झाले होते.यातून ते बरे झाले.नंतर ते पठाणकोट येथे रुजू झाले .मात्र पुन्हा त्यांची प्रकृती खालावली त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरु असताना काल त्यांची प्राण ज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन महिन्याची  मुलगी असे कुटुंब आहे. त्यांचे शिक्षण परभणी येथे झाले.
जिजाभाऊ मोहिते यांनी स्पर्धा परीक्षा दिली होती त्यातून त्यांची निवड भारतीय हवाई दल सेवेत झाली. गेल्या वर्षीच ते विवाह बंधनात अडकले होते.  

त्यांचे पार्थिव देह त्यांच्या गावाला पठाणकोट येथून विमानाने हैद्राबाद आणले जाणार नंतर त्यांच्या गावी नेणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आली.