सोनम गुप्ता मी नाही तर तू बेवफा त्याला चांगलेच तुडवले
देशात नोट बंदी झाली आणि एकाच गोंधळ झाला असे चित्र होते. सर्व नोटा बदलत होते.यातच एक कहाणी होती पूर्वीच्या प्रेमाची ती रांगेत पुन्हा दिसली. मग काय प्रियकराला जो तुडवला तो एक विषयच झाला आहे.
मुलीशी प्रेमाचे नाटक करुन फसवून गेलेला प्रियकर तब्बल ५ वर्षांनी तरुणीला बँकेच्या रांगेत सापडला होता तो हि नोटा बदलवून घेताना. यामध्ये भूतकाळातील हृदयातील वेदना फसवणूक पुन्हा आठवली आणि मग काय मुलीनी घेतला दुर्गावतार प्रियकराला कुटुंबियांच्या मदतीने बेदम झोडपले आहे. एखाद्या चित्रटात शोभेल अशी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे, ती नाशिकमधील सातपूर परिसरात घडली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोख रक्कम काढण्यासाठी हा तरूण एका बँकाबाहेरील रांगेत उभा होता. मात्र त्याचवेळी तिथे आली, ती त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसलेली एक तरुणी होती. मात्र पाच वर्षापूर्वी ज्याने फसविले तो दिसला आणि तिचे डोके सरकले तिने त्या तरुणाला असे चोपले की तो पोलिसात न जाता पळून गेला आहे. तर मुलगी आपली असे समजून अनेकांनी तिचे नाव सार्वजनिक केले नाही.मात्र तिला ठावूक आहे हा मुलगा कोठे आहे त्यामुळे त्याला अजून तरी मुक्ती नाही.