1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोरगाव-भीमाला छावणीचे रुप

koregaon bhima
गेल्यावर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा पुणे जिल्ह्यातील कोरगाव-भीमाला छावणीचं रुप देण्यात आलंय. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड, २००० स्वयंसेवक आणि ५२० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. 
 
कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भीम आर्मीच्या 15 कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.