1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (16:23 IST)

SSC-Exam-Date : दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

/ssc exam date 2022
दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर दहावीचा निकाल जुलैच्या दुसर्याो आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी दिली.
 
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान होईल.
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
 
दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक 
15 मार्च – प्रथम भाषा 
16 मार्च – द्वितीय व तृतीय भाषा 
21 मार्च – हिंदी 
22 मार्च – संस्कृत, उर्दू, गुजराती आणि द्वितीय आणि तृतीय भाषा 
24 मार्च – गणित भाग 1 
26 मार्च – गणित भाग 2 
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 
30 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 
1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1 
4 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 2
 
निकाल : इ. दहावीचा निकाल जुलै 2022च्या दुसर्याद आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.