1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (17:29 IST)

SSC Result 2024: या तारखेला जाहीर होणार 10 वी चा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीचा निकालाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिण्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल बाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता लागली आहे. आत्ताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता 10 वी चा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. 

तर आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा सम्पली असून येत्या 27 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 
 
विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपाने त्याच्या निकाल पाहता येईल. दहावीचे विद्यर्थी निकाल mahresult.nic या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजे नंतर पाहता येईल. तसेच विद्यार्थी डिजिलॉकरवर देखील निकाल पाहू शकतील.
राज्यात मोठ्या संख्येनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांचा निकाल येत्या 27 मे रोजी जाहीर होणार आहे. 

Edited by - Priya Dixit