1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2023 (13:53 IST)

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर Maharashtra SSC Result 2023

maharashtra board result 2023
Maharashtra SSC Result 2023 खूप दिवसांपासून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी म्हणजे 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.
 
आता दहावीचा निकाल उद्या लागणार 
10वी चा निकाल पाहण्यासाठी लिंक - 
 
अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.
 
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जाऊन सीट नंबर आणि आईचे नाव सबमिट करा. लॉगिन करा आणि तुमचा 10वीचा निकाल तपासा.
 
10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
 
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.